तलवारीने आक्रमण करणार्‍याला अटक !

मीरा-भाईंदर – येथून तडीपार करण्‍यात आलेल्‍या गुंडाने दोन तरुणांवर तलवारीने प्राणघातक आक्रमण केले. या प्रकरणी पोलिसांनी गुंडासह त्‍याच्‍या दोन साथीदारांना अटक केली आहे. (कायदा-सुव्‍यवस्‍थेचा धाकच राहिला नसल्‍याचे उदाहरण ! – संपादक) या आक्रमणात दोघेही गंभीर घायाळ झाले असून त्‍यांची प्रकृती चिंताजनक आहे.