नारायणगाव (जिल्हा पुणे) येथील ज्ञानयोगी संत प.पू. काणे महाराज यांचा पुण्यतिथी उत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा !

अथर्वशीर्ष पठण

नारायणगाव (जिल्हा पुणे) – येथील थोर संत प.पू. काणे महाराज यांचा सहावा पुण्यतिथी उत्सव १६ नोव्हेंबर २०२३ या दिवशी मनोहरबाग, नारायणगाव येथे भावपूर्ण वातावरणात साजरा झाला. कार्यक्रमाच्या प्रारंभी सकाळी ५.३० ते ८ वाजेपर्यंत श्री. माधवमामा बारसोडे यांनी प.पू. काणे महाराजांच्या पादुकांवर पवमान आणि रूद्राभिषेक केला. त्यानंतर सकाळी ८ ते ८.३० पर्यंत पादुका पूजन आणि आरती झाली. श्री. मधुकर पुरुषोत्तम कुलकर्णी यांनी पौरोहित्य केले.

यज्ञाची पूर्णाहुती

सकाळी ८.४५ ते ९ पर्यंत सर्व भक्तांनी विष्णुसहस्रनाम म्हटले. सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या मंत्राचा सामूहिक जप करण्यात आला. याचा १३ लाख जप करण्याचा संकल्प होता. प्रत्यक्षात १४ लाख ५८ सहस्र जप झाला.

पू. काणे महाराजांच्या पादुकांचे पूजन

या वेळी प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. काणे महाराज यांचे शिष्य श्री. शशिकांत ठुसे अन् भक्त मंडळी उपस्थित होती. या वेळी सनातन संस्थेचे डॉ. राहुल दवंडे यांनी श्री. शशिकांत ठुसे यांना वर्ष २०२४ चे सनातन पंचांग भेट दिले. कार्यक्रमाची सांगता महाप्रसादाने झाली.