ज्ञानवापीचा सर्वेक्षण अहवाल सादर करण्यासाठी आणखी १५ दिवसांच्या मुदतीसाठी न्यायालयात याचिका
आज सुनावणी
वाराणसी – भारतीय पुरातत्व सर्वेक्षण पथकाने (ए.एस्.आय.ने) ज्ञानवापीच्या सर्वेक्षणाचा अहवाल सादर करण्यासाठी न्यायालयाकडे आणखी १५ दिवसांची मुदत मागितली आहे. यावर १७ नोव्हेंबरला होणारी सुनावणी १८ नोव्हेंबरला होणार आहे. प्रत्यक्षात ज्ञानवापी परिसरात अनुमाने ३ मास चाललेल्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा अहवाल जिल्हा न्यायाधीश डॉ. अजय कष्ण विश्वेश यांच्या न्यायालयात सादर होणार होता.
श्रृंगार गौरीसह मूर्तींची पूजा करण्याचा अधिकार मागणार्या देहलीच्या राखी सिंह यांच्यासह ५ महिलांच्या याचिकेवर जिल्हा न्यायालयाने ज्ञानवापी परिसराचे सर्वेक्षण करण्याचा आदेश दिला होता. या महिलांनी सांगितले होते की, ज्ञानवापी आवारात पूर्वीपासून आदिविश्वेश्वर, पार्वतीमाता, श्रृंगार गौरी, श्री हनुमान इत्यादी मूर्ती आहेत. भूतकाळात परकीय आक्रमकांनी त्यांना हानी पोचवली आणि ढिगार्याखाली झाकून टाकल्या. श्रृंगार गौरीसह काही मूर्ती स्पष्ट दिसतात; परंतु त्यांची पूजा करण्यापासून रोखले जाते. इतर पंथाचे लोक त्यांना हानीही पोचवू शकतात, असाही दावा करण्यात आला होता.