जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथील शिव मंदिरात बाँबस्फोट : ३ आतंकवाद्यांना अटक
श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील पूंछ येथे असलेल्या शिव मंदिरात आतंकवाद्यांनी बाँबस्फोट करण्यात आला. स्थानिक पोलीस आणि सुरक्षादलाचे सैनिक यांनी घटनास्थळी धाव घेऊन परिसराला वेढा घातला. या बाँबस्फोटाच्या प्रकरणी अहमद शेख या सरकारी शिक्षकासह अब्दुल रशीद सालियन आणि मेहराज अहमद या आतंकवाद्यांना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या आतंकवाद्यांचा ‘लष्कर-ए-तोयबा’ या आतंकवादी संघटनेशी संबंध होता.
या घटनेविषयी माहिती देतांना मंदिराचे पुजारी अतुल शर्मा म्हणाले की, १५ नोव्हेंबरला रात्री ८ वाजून ५० मिनिटांनी हा बाँबस्फोट झाला. पुजार्याने पोलीस अधिकार्यांना संपर्क केला. यानंतर सुरनकोटचे पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक घटनास्थळी पोचले. या प्रकरणी पोलीस पुढील अन्वेषण करत आहेत.