Hamas Is Killing hostages : हमास ओलिसांची हत्या करत असल्याचा इस्रायलचा दावा !
गाझातील ‘अल्-शिफा’ रुग्णालयाजवळ सापडला मृतदेह !
तेल अविव (इस्रायल) – हमासने साधारण २४० लोकांना ओलीस ठेवले आहे. यांमध्ये इस्रायली नागरिकांसह अमेरिका आदी पाश्चात्त्य राष्ट्रांच्या नागरिकांचाही समावेश आहे. अशातच इस्रायली सैन्याने दावा केला आहे की, हमासचे आतंकवादी या ओलिसांना ठार मारत आहेत. गाझातील सर्वांत मोठे रुग्णालय ‘अल्-शिफा’ येथे ओलीस ठेवलेल्या एका महिलेचा मृतदेह सापडल्याचे इस्रायली सैन्याने म्हटले आहे. येहुदित वेस असे मृत महिलेचे नाव असून युद्धग्रस्त पॅलेस्टिनी प्रदेशात आतंकवाद्यांनी तिची हत्या केली, असे इस्रायली सैन्याचे म्हणणे आहे.
Yehudit Weiss was a 65-year-old who worked with kindergarten kids.
On October 7, Yehudit was abducted by Hamas from her home in Kibbutz Be’eri. Her husband, Shmulik Weiss, was murdered in their home. Yehudit and Shmulik were parents to 5 children.
IDF soldiers recovered her… pic.twitter.com/Y7tpt8nU3o
— Israel Defense Forces (@IDF) November 16, 2023
‘गाझा पट्टीमध्ये येहुदितला आतंकवाद्यांनी ठार मारले आणि आम्ही वेळीच तिच्यापर्यंत पोचण्यात अयशस्वी ठरलो’, असे सैन्याधिकारी डॅनियल हगारी यांनी म्हटले. दुसरीकडे हमासने मात्र या हत्येला इस्रायलकडून करण्यात येत असलेल्या बाँब आक्रमणांना उत्तरदायी धरले आहे. इस्रायलच्या आक्रमणात ओलीस ठेवलेले मारले जात आहेत, असे हमास म्हणत आहे.