हमासने केलेला इस्रायलींचा नरसंहार योग्यच ! – ५७.५ टक्के अमेरिकी मुसलमानांचे मत
वॉशिंग्टन (अमेरिका) – हमासकडून ७ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या आक्रमणात १ सहस्र २०० हून अधिक इस्रायली नागरिक मारले गेले. यानंतर इस्रायलने हमासच्या आतंकवाद्यांचा नायनाट करण्यासाठी जी आक्रमणे चालू केली, त्या विरोधात जगभरातील मुसलमान त्यांच्या देशांत इस्रायलच्या विरोधात निषेध आंदोलने करू लागले. अनेक ठिकाणी हिंसाचारही झाला. अशातच ‘साइग्नल’ नावाच्या संस्थेने अमेरिकी मुसलमानांचे सर्वेक्षण केले. त्यात हमासने इस्रायलींचा नरसंहार योग्यच असल्याचे मत ५७.५ टक्के अमेरिकी मुसलमानांनी व्यक्त केले आहे. या सर्वेक्षणाच्या अंतर्गत २ सहस्र २० अमेरिकी मुसलमानांना काही प्रश्न विचारण्यात आले होते.
या सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार,
१. ‘इस्लामी उम्मा’नुसार जगभरातील मुसलमानांनी एकमेकांच्या समर्थनार्थ उभे राहिले पाहिजे. या सर्वेक्षणातील आकडेवारी ‘अमेरिकी मुसलमान ‘इस्लामी उम्मा’च्या शिकवणीला मानतात’, हे दर्शवते.
२. केवळ ३१.९ टक्के अमेरिकी मुसलमानच त्यांचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांचे समर्थन करतात, तर तब्बल ४४ टक्के मुसलमान हे पॅलेस्टिनी राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांचे समर्थन करतात.
३. धोरणात्मक प्रश्नांवर अमेरिकी मुसलमानांचे मत घेतले असता असे लक्षात आले की, केवळ ४६.८ टक्के मुसलमानांना वाटते की, हमासला नष्ट करण्यासाठी इस्रायलने गाझावर आक्रमण करणे योग्य आहे.
संपादकीय भूमिका
|