२६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत साजरा होत आहे जन्मशताब्दी महोत्सव !
प.पू. रामानंद महाराज (दादा) यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त कार्यक्रम
इंदूर (मध्यप्रदेश) – सनातनचे प्रेरणास्थान प.पू. रामानंद महाराज (दादा) यांच्या जन्मशताब्दी वर्षात, म्हणजे २६ ऑक्टोबर २०२३ ते २६ ऑक्टोबर २०२४ या कालावधीत न्यास आणि युवा शक्ती, स्त्री शक्ती श्रीरामचंद्र देव ट्रस्ट; प.पू. भक्तराज महाराज समाधी ट्रस्ट, कांदळी; श्री मयुरेश्वर महादेव मंदिर देवस्थान ट्रस्ट; श्री भक्तराज महाराज आश्रम, मोरचोंडी यांच्या सहकार्याने एक भव्यदिव्य शतक महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
या निमित्ताने इंदूर येथे मासाच्या प्रत्येक रविवारी भाजी-पुरी (बालभोग) वाटप आणि मोरटक्का येथील नर्मदातीरावर अमावास्येला भाजी-पुरी (बालभोग) वाटप करण्यात येणार आहे. ‘श्रीराम जय राम जय जय राम’ या तारक मंत्राचा १३ लाख जप लिखित स्वरूपात करण्याचे ठरवण्यात आले आहे. हा मंत्र लिहिण्यासाठी न्यासाच्या वतीने वह्यांचे वाटप करण्यात येईल. इच्छुकांनी श्री. रवींद्र कर्पे यांना ९८२६०८९८४७ या क्रमांकावर संपर्क साधावा. भक्तांनी गावोगावी भजनांचे कार्यक्रम आयोजित करावेत. न्यासाद्वारे आयोजित करण्यात येणार्या वार्षिक उत्सवांमध्ये जन्मशताब्दीच्या अनुषंगाने इतर कार्यक्रम आयोजित करण्यात येतील. ‘प्रत्येक मासात विविध भजनी मंडळांचे कार्यक्रम, सुंदरकांड, कीर्तन, प्रवचन, यज्ञ-याग आणि इतर धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात येतील’, असे आयोजकांकडून कळवण्यात आले आहे. जन्मशताब्दीचा उपक्रम अजरामर व्हावा, यासाठी न्यासाच्या वतीने २० ग्रॅम चांदीचे नाणे काढण्यात येणार आहे. त्याच्या एका बाजूस प.पू. रामानंद महाराजांची प्रतिमा आणि दुसर्या बाजूस स्वस्तिक असेल.
कार्यक्रमाच्या संदर्भातील अधिक माहितीसाठी संपर्क
- सुश्री सीमा गरुड – ९९२३५१०४७७
- श्री. राजन पंडित – ७५०७२३३९९०
- श्री. भालचंद्र (छंदा) दीक्षित – ९४२२७५६२६१