प्रदूषण वाढवणारे फटाके वाजवणार्या १५० हून अधिक जणांवर गुन्हे नोंद !
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण
कल्याण-डोंबिवली – येथील परिसरात मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करत दिवाळीनिमित्त प्रदूषण वाढवणारे फटाके आणि फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. या प्रकरणी १५० हून अधिकांवर गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. या गुन्ह्यांच्या संख्येत वाढ होण्याची शक्यता आहे.
संपादकीय भूमिकाकेवळ गुन्हे नोंद करून न थांबता संबंधितांना कठोर शिक्षा केल्याविना असे प्रकार थांबणार नाहीत ! |