भारतात लवकरच धर्माधारित हिंदु राष्‍ट्र स्‍थापन होणार ! – श्रीराम काणे, धर्मप्रचारक, हिंदु जनजागृती समिती

इंदूर (मध्‍यप्रदेश) येथे चर्चासत्राचे आयोजन

चर्चासत्रात मार्गदर्शन करतांना हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक श्री. श्रीराम काणे (डावीकडील)

इंदूर (मध्‍यप्रदेश) : सध्‍या सनातन धर्माचे महत्त्व संपूर्ण जगाला कळायला लागले आहे. युरोप-अमेरिकेतील अनेक लोक स्‍वतःहून हिंदु धर्म स्‍वीकारत आहेत. अलीकडेच अमेरिकेत जगातील दुसर्‍या क्रमांकाचे सर्वांत मोठे मंदिर स्‍थापन करण्‍यात आले आहे.

श्री. श्रीराम काणे

भारतात सरकारीकरण झालेल्‍या मंदिरातील निधीचा योग्‍य वापर करण्‍यासाठी सदाचारी शासनकर्त्‍यांनी चालवलेल्‍या धर्मावर आधारित हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना करणे आवश्‍यक आहे. धर्माच्‍या आधारे भारतात लवकरच हिंदु राष्‍ट्राची स्‍थापना होईल, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे धर्मप्रचारक श्री. श्रीराम काणे यांनी केले. येथील प्रसिद्ध गीता भवन मंदिरात आयोजित चर्चासत्रात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे आयोजन प्रसिद्ध समाजसेवक श्री. बाबूलाल सोनी यांनी केले.