२ आणि ३ डिसेंबरला नागपूर येथे राज्यशासन आयोजित करणार ‘महारोजगार मेळावा’ !
मुंबई – राज्यातील अधिकाधिक युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी २ आणि ३ डिसेंबर या दिवशी राज्यशासनाच्या वतीने नागपूर येथे राज्यस्तरीय ‘महारोजगार मेळावा’ आयोजित करण्यात येणार आहे. या मेळाव्यामध्ये राज्यातील नामांकित उद्योजक सहभागी होणार आहेत. या मेळाव्यासाठी ६ कोटी ४५ लाख ४७ सहस्र रुपये व्ययाचे असे अंदाजपत्र कौशल्य, रोजगार, उद्योजकता विभागाने शासनाकडे सादर केले आहे.