संस्कृत भाषेचे सौंदर्य !
माणसाचा आदर्श !
आश्रमान् तुलया सर्वान् धृतान् आहुः मनीषिणः ।
एकतश्च त्रयो राजन् गृहस्थाश्रमः एकतः ॥ – महाभारत, शांतिपर्व
अर्थ : ब्रह्मचर्य, गृहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास या ४ आश्रमांची तुलना केली, त्यांना तराजूत बसवले, तर एका पारड्यात इतर तीनही आश्रम अन् दुसर्यात एक गृहस्थाश्रम, अशी तुलना होईल. गृहस्थ हा आपली कर्तव्ये करून कुटुंबाचे आणि समाजाचे पोषण करतो. गृहस्थ धनाचा उपयोग करून ब्रह्मचारी (विद्यार्थी), वनात रहाणारे मुनी आणि संन्यासी यांचा चरितार्थ चालवतो म्हणून तो सर्वश्रेष्ठ !