Colombia ‘junk food law’: जगात प्रथमच कोलंबिया देशाने बनवला ‘जंक फूड’ संदर्भात कायदा !
या कायद्यानुसार ‘जंक फूड’ पदार्थावर आकारला जाणार १० ते २० टक्के कर !
बोगोटा (कोलंबिया) – दक्षिण अमेरिका खंडातील कोलंबिया देशाने नुकताच ‘जंक फूड’च्या (‘जंक फूड’मध्ये बर्गर, पिझ्झा, वेफर्स आदींचा समावेश होतो) संदर्भात कायदा बनवला आहे. जगात अशा प्रकारचा कायदा करणारा कोलंबिया पहिला देश ठरला आहे. जंक फूडमुळे नागरिकांच्या आरोग्यवार होणार्या विपरीत परिणामांमुळे हा कायदा करण्यात आला आहे. यामध्ये जंक फूडवर कर आकारण्यात येणार आहे. सध्या १० टक्के आणि नंतर २० टक्के कर आकारण्यात येणार आहे.
जंक फूड असणार्या पदार्थांमध्ये मीठ आणि सॅच्युरेटेड फॅट यांचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. यासह यांत सॉस, जेली, जॅम, प्यूरी आदींचा समावेश आहे. अशा पदार्थांच्या पाकिटावर आरोग्यसंबंधित चेतावणही प्रसिद्ध करण्यात येणार आहे. कोलंबियामध्ये प्रत्येक व्यक्ती प्रतिदिन १२ ग्राम मीठाचे सेवन करतो, जे सर्वाधिक आहे. यामुळे उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आदी आरोग्याच्या समस्या निर्माण होतात.
संपादकीय भूमिका‘जंक फूड’मुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होतात, हे जगजाहीर असतांना आजही याकडे गांभीर्याने पाहिले न जाणे लज्जास्पद !
|