५० वर्षांपूर्वी चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती लंडन येथे भारताकडे सुपुर्द !
लंडन (ब्रिटन) – भारतातून चोरण्यात आलेल्या देवतांच्या ८ व्या शतकातील २ मूर्ती येथे भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्या उपस्थितीत पुन्हा भारताकडे सुपुर्द करण्यात आल्या. वर्ष १९७० आणि १९८० मध्ये उत्तरप्रदेशातील लोखरी येथील एका मंदिरातून श्री योगिनी चामुंडा आणि श्री योगिनी गोमुखी यांच्या मूर्ती चोरण्यात आल्या होत्या. या मंदिरात योगिनींच्या २० मूर्ती होत्या. चोरलेल्या या २ मूर्ती भारतीय उच्चायुक्तालयाने ‘इंडिया प्राईड प्रोजेक्ट’ आणि ‘आर्ट रिकवरी इंटरनॅशनल’ यांच्या सहकार्याने शोधून काढल्या. या मूर्ती चोरणार्यांनी तस्करीच्या माध्यमांतून युरोपमध्ये विकल्या होत्या. त्यांनी अनेक मूर्ती चोरल्या आहेत. काही मूर्ती फोडून टाकल्या, तर काही विकल्या.
‘आर्ट रिकवरी इंटरनॅशनल’च्या क्रिस मॅरिनेलो यांनी सांगितले की, ही पाचवी घटना आहे की, आम्ही मिलान, ब्रसेल्स आणि लंडन येथून अशा प्रकारचा सांस्कृतिक वारसा परत मिळवण्यात यश मिळाले आहे.