Occasion Of Navy Day : सिंधुदुर्ग विमानतळावर आता रात्रीही विमानसेवा चालू होणार !

‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळा’वर ‘नाईट लँडिंग’च्या अनुषंगाने यंत्रणा कार्यान्वित

कुडाळ : वेंगुर्ला तालुक्यातील ‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळा’वर ‘नाईट लँडिंग’च्या (रात्रीची विमानसेवा मिळण्याच्या) अनुषंगाने यंत्रणा बसवण्यात आली असून लवकरच या विमानतळावरून रात्रीची विमान सेवा चालू करण्यात येणार आहे. ४ डिसेंबर या दिवशी मालवण येथे साजर्‍या होणार्‍या नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर ही सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

‘सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळ’

नौसेना दिन कार्यक्रमासाठी राष्ट्रपती, पंतप्रधान यांच्यासह अनेक महनीय व्यक्ती मालवण येथे येणार आहेत. या पार्श्वभूमीवर या विमानतळावर ‘नाईट लँडिंग’ची सुविधा असणे आवश्यक आहे. यासाठी प्रशासकीय पातळीवरही प्रयत्न चालू होते. लवकरच देहली येथील ‘नागरी विमान वाहतूक महासंचालनालया’चे पथक या विमानतळावर येऊन ‘नाईट लँडिंग’ सुविधेची तपासणी करणार आहे. त्यानंतर चिपी विमानतळावर ही सेवा चालू होणार आहे. ‘सध्या या विमानतळावरून एकाच विमान आस्थापनाकडून केवळ दिवसाची विमानसेवा चालू आहे’, अशी माहिती सूत्रांनी दिली.