सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ब्रह्मोत्सवातील चैतन्याची साधिकेला तिच्या नातवाच्या संदर्भात आलेली प्रचीती !
१. साधिकेच्या नातवाला असलेल्या आध्यात्मिक त्रासामुळे त्याने इतरांना ‘नामजप करू नका’, असे सांगणे आणि सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्यावर त्याचे इतरांना ‘नामजप करू नका’, असे सांगणे बंद होणे
‘वर्ष २०२२ च्या श्री गणेशचतुर्थीपासून माझा नातू कु. आर्यमन अभिजित नाडकर्णी याने नामजप लिहिण्याचे बंद केले होते. तो मला भ्रमणभाष करून सांगत असे, ‘‘आजी, तू नामजप करू नकोस. नामजप करणे वाईट सवय आहे.’’ देवळात बसून नामजप करत असलेल्या भक्तांनाही तो ‘नामजप करू नका’, असे सांगत असे. एका संतांनी मला सांगितले, ‘‘आर्यमनला आध्यात्मिक त्रास आहे.’’ आम्ही त्याच्यासाठी सद़्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना नामजपादी उपाय विचारले. त्यांनी सांगितलेले नामजपादी उपाय आम्ही केल्याने आर्यमनमध्ये थोडी सुधारणा झाली. त्याचे इतरांना ‘नामजप करू नका’, असे सांगणे बंद झाले.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा ब्रह्मोत्सव साजरा झाल्यावर साधिकेच्या नातवाने पूर्वीसारखा नामजप लिहिणे चालू करणे
महर्षींच्या आज्ञेने ११.५.२०२३ या दिवशी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचा अनुपम ब्रह्मोत्सव साजरा झाला. तो सोहळा झाल्यावर मी घरी गेल्यावर दुसर्या दिवसापासून आर्यमनने नामजप लिहायला आरंभ केला. अधून मधून तो ‘गोविंदा गोविंदा’, असे नामसंकीर्तन करू लागला. १२.५.२०२३ या दिवसापासून तो पूर्वीप्रमाणे ३ पाने नामजप लिहू लागला.
३. साधकांनी केलेल्या ब्रह्मोत्सवाच्या सूक्ष्म परीक्षणात ‘साधकांचे आध्यात्मिक त्रास या सोहळ्यानंतर दूर होतील’, असे सांगितले होते. त्याची आम्हाला प्रचीती आली.
महर्षि आणि सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– श्रीमती गीता प्रभु (वय ६७ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (२६.६.२०२३)
• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात. • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात. येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |