दिवाळीच्या कालावधीत चीनला १ लाख कोटी रुपयांचा फटका !
|
नवी देहली – भारतात दिवाळीच्या दिवसांत ३ लाख ७५ सहस्र कोटी रुपयांची विक्रमी उलाढाल झाल्याची माहिती ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’कडून देण्यात आली. कार्तिक पौर्णिमेपर्यंत हा आकडा ४ लाख २५ सहस्र कोटी रुपयांचा पल्ला पार करेल, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात येत आहे. ‘कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’चे सरचिटणीस प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, यंदा चीनला दिवाळीच्या कावलाधीत व्यवसायात १ लाख कोटी रुपयांहून अधिकचा रकमेचा तोटा झाला. पूर्वीच्या काळात दिवाळीच्या कालावधीत चीनमध्ये बनवलेल्या वस्तूंना भारतीय बाजारपेठेत ७० टक्के हिस्सा मिळायचा.
या वेळी हे प्रमाण फारच अल्प झाले होते. देशातील व्यापार्यांनी यंदा चीनमधून दिवाळीशी संबंधित कोणतीही वस्तू आयात केलेली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ मोहिमेचा हा परिणाम आहे. देशातील सर्व शहरांतील स्थानिक उत्पादक, कारागीर आणि कलाकार यांनी बनवलेल्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणात विक्री झाली. त्यामुळे दिवाळी सणाच्या माध्यमातून देश आणि जगाला स्वावलंबी भारताची विशेष झलक दाखवण्यात आली.
संपादकीय भूमिकाभारतियांनी कायमच अशी राष्ट्रनिष्ठा दाखवल्यास चीनला वठणीवर यायला वेळ लागणार नाही ! |