पाकिस्तानने युक्रेनला विकली ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे ; रशियाकडून मिळवले स्वस्तात कच्च तेल !
पाकिस्तानची कूटनीती !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – आर्थिक संकटात सापडलेला पाकिस्तान रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला घातक शस्त्रे विकत आहे. पाकिस्तानने आतापर्यंत युक्रेनला ३ सहस्र कोटी रुपयांची शस्त्रे विकल्याचा दावा एका वृत्त अहवालात करण्यात आला आहे. त्याचवेळी पाकिस्तान रशियाकडून स्वस्तात कच्चे तेल मिळवत आहे. (हे आहे पाकिस्तानचे खरे स्वरूप ! – संपादक)
एका अहवालानुसार २०२२-२३ या आर्थिक वर्षात पाकिस्तानच्या शस्त्रास्त्रांच्या निर्यातीत ३ सहस्र टक्क्यांनी वाढ झाल्याचे स्टेट बँक ऑफ पाकिस्तानच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे. पाकिस्तानने वर्ष २०२१-२२ मध्ये १०७ कोटी रुपयांच्या शस्त्रास्त्रांची निर्यात केली, तर वर्ष २०२२-२३ मध्ये ती वाढून ती ३ सहस्र ४४७ कोटी रुपयांची झाली.
शस्त्रास्त्रांच्या निर्यातीचे वृत्त पाकने फेटाळलेे !पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने मात्र युक्रेनला शस्त्रास्त्रे आणि दारूगोळा विकल्याचे वृत्त फेटाळून लावले आहे. आम्ही कठोर तटस्थतेचे धोरण स्वीकारले असल्याचेही पाकने स्पष्ट केले. |