जीभ घसरल्याने ऐश्वर्या बच्चन यांचे नाव घेतले, याची मला लाज वाटते ! – पाकचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक
भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानाच्या प्रकरणी पाकचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक याच्याकडून क्षमायाचना !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानचा माजी क्रिकेट खेळाडू अब्दुल रज्जाक याने भारतीय अभिनेत्री ऐश्वर्या बच्चन यांच्याविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून क्षमा मागितली आहे. रज्जाक याचे विधान प्रसारित झाल्यानंतर त्याच्यावर पाकिस्तानातूनच मोठ्या प्रमाणावर टीका होऊ लागल्यानंतर त्याने क्षमा मागितली. रज्जाक याने म्हटले की, मी तेथे क्रिकेटविषयी बोलत असतांना माझी जीभ घसरली आणि मी ऐश्वर्या बच्चन यांचे नाव घेतले. यासाठी मला फारच लाज वाटते.
We were talking about cricket yesterday, and I meant to give a different example, but Aishwarya’s name slipped out of my mouth. I’m sorry 🙏 #AishwaryaRai #AbdulRazzaq pic.twitter.com/LKp2uFNxXm
— Abdul Razzaq (@AbdulRazzaq_PAK) November 14, 2023
काय म्हणाला होता रज्जाक ?
कराची येथील मॅरियट हॉटेलमध्ये एका कार्यक्रमात बोलतांना रज्जक याने पाकिस्तान क्रिकेट बोर्डची तुलना ऐश्वर्या यांच्याशी करतांना ‘तुम्ही असे समजत असाल की, मी ऐश्वर्या यांच्याशी विवाह केल्याने होणारी मुले प्रमाणिक आणि चांगली असतील, तर असे होणार नाही; कारण त्यापूर्वी तुम्हाला तुमचा हेतू नीट करायला हवा’, असे विधान केले होते. (हिंदु महिलांविषयी पाकिस्तानी मुसलमानांचे असलेले विचार लक्षात घ्या ! या विधानाला भारतातील एकाही क्रिकेटपटू किंवा अन्य खेळाडू, तसेच चित्रपट क्षेत्रातील व्यक्तींनी विरोध केलेला नाही. यातून भारतातील वलयांकित लोक कशा मानसिकतेचे आहेत ?, हे लक्षात येते ! – संपादक)
This is why don’t lecture Sehwag or Gambhir when they treat these Pakistanis with contempt and scorn that they deserve.
As Razzaq makes Hinduphobic and misogynist comments citing Aishwarya Rai, Shahid Afridi amd Umar Gul are seen laughing and applauding pic.twitter.com/LTRKHq9B5J
— Brutal Truth (@sarkarstix) November 14, 2023
संपादकीय भूमिकाजीभ घसरल्यासारखी कारणे सांगणे हे ढोंग आहे, सत्य हिंदु आणि भारतद्वेष हेच मुख्य कारण आहे, हे भारतियांना ठाऊक आहे ! |