कॅनडामध्ये ख्रिस्ती व्यक्तीने एकाच कुटुंबातील ५ मुसलमानांना ट्रकखाली चिरडून ठार मारले !
ओटावा (कॅनडा) – कॅनडामध्ये नॅथालिएन वेल्टमॅन या व्यक्तीने एका मुसलमान कुटुंबाला पिकअप ट्रक खाली चिरडून ठार मारले या प्रकरणी वेल्टमॅन याला अटक करण्यात आली आहे. ठार झालेल्यांमध्ये सलमान अफझल, त्याची पत्नी मदिहा सलमान, युमनाह आणि आजी तलत अफझल यांचा समावेश आहे. नॅथालिएन वेल्टमॅन हा श्वेत लोकांच्या राष्ट्राचा पुरस्कर्ता असून तो मुसलमानांचा द्वेष करतो.