विवाहित असल्याची माहिती लपवून फसवणूक करण्याच्या प्रकाराचाही गुन्ह्यात समावेश करण्याची संसदेच्या समितीची शिफारस !
लव्ह जिहाद रोखण्याचा प्रयत्न
नवी देहली – भारतीय न्याय संहिता विधेयकाच्या कलम ६९ अन्वये फसवणूक करून किंवा लग्नाच्या बहाण्याने शारीरिक संबंध ठेवणे, हे बलात्कारासारखे मानण्याचा प्रस्ताव आहे. अशा प्रकरणांत १० वर्षांपर्यंत कारागृहवासासह दंडाची शिक्षा आहे. या तरतुदीअंतर्गत ‘वैवाहिक स्थिती’ लपवण्याचाही समावेश करावा, अशी शिफारस केंद्रीय गृहमंत्रालयाशी संबंधित संसदेच्या स्थायी समितीनेे केली आहे. ‘लव्ह जिहाद’च्या विरोधात ही कठोर तरतूद असल्याचे बोलले जात आहे.
समितीने सांगितले की, अशी अनेक प्रकरणे न्यायालयात आली. संसदेत सादर केलेले भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरी संरक्षण संहिता आणि भारतीय पुरावा विधेयक पुनरावलोकनानंतर संसदेच्या हिवाळी अधिवेशनात सादर होईल. या अधिवेशनास ४ डिसेंबरपासून प्रारंभ होणार आहे.