‘महाराष्‍ट्र वैभव योजने’त पालट ! – पर्यटन आणि सांस्‍कृतिक कार्य विभाग

पुणे – राज्‍यशासन ‘महाराष्‍ट्र वैभव राज्‍य संरक्षित स्‍मारक योजना’ राबवते. राज्‍यातील प्राचीन स्‍मारके, गड, लेणी, शिलालेख, पारंपरिक कला अशा वारशांचे जतन योजनेतून केले जाते. संरक्षित स्‍मारकांचे पालकत्‍व १० वर्षांसाठी घेता येईल. स्‍मारकांच्‍या परिसरात सोयी-सुविधा उपलब्‍ध करणे, जतन, दुरुस्‍ती, देखभाल, सुशोभिकरण, देखभालीसाठी लोकसहभाग मिळवणे, पर्यटकांची संख्‍या वाढवणे आदी उपक्रम ‘पुरातत्‍व विभागा’च्‍या अनुमतीने करावे लागतील, हे पालट योजनेत केले आहेत, हा निर्णय पर्यटन आणि सांस्‍कृतिक कार्य विभागाने घेतला. या योजनेंतर्गत स्‍मारकांची मूळ मालकी ही शासनाकडेच राहील. संरक्षित स्‍मारकाच्‍या देखभाल-दुरुस्‍तीच्‍या कामाचे पालकत्‍व घेणार्‍या संस्‍थेसह पुरातत्‍व विभागाशी करार करावा लागेल.