फोंडा, गोवा येथील ६५ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली कु. मैथिली स्वप्नील नाटे (वय १० वर्षे) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. मैथिली स्वप्नील नाटे ही या पिढीतील एक आहे !
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
‘वर्ष २०१९ मध्ये ‘कु. मैथिली स्वप्नील नाटे महर्लोकातून पृथ्वीवर जन्माला आली असून तिची आध्यात्मिक पातळी ६४ टक्के आहे’, असे घोषित करण्यात आले होते. वर्ष २०२३ मध्ये तिची आध्यात्मिक पातळी ६५ टक्के झाली आहे. तिच्यावर पालकांनी केलेले योग्य संस्कार, तिची साधनेची तळमळ आणि तिच्यातील भाव यांमुळे आता तिची साधनेत प्रगती होत आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले (११.११.२०२३) |
आश्विन कृष्ण त्रयोदशी (११.११.२०२३) या दिवशी फोंडा, गोवा येथील कु. मैथिली स्वप्नील नाटे हिचा १० वा वाढदिवस झाला. त्यानिमित्त तिचे वडील आणि आजोबा (आईचे वडील) यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.
१. श्री. स्वप्नील नाटे (मैथिलीचे वडील), गोवा
१ अ. समंजस : ‘कु. मैथिली तिची लहान बहीण चि. जयती (आध्यात्मिक पातळी ६१ वर्षे, वय ४ वर्षे) हिला समजून घेते आणि तिची काळजीही घेते. तिच्या शाळेतील शिक्षिका आणि आमचे नातेवाईक म्हणतात, ‘अन्य मुलांच्या तुलनेत मैथिली पुष्कळ समंजस आहे.’
१ आ. तिची शाळेतील बर्याच जणांशी जवळीक आहे.
१ इ. परात्पर गरु डॉ. आठवले यांच्याप्रती असलेला भाव : तिच्या मनात सनातनच्या तिन्ही गुरूंविषयी भाव आहे.
१. एकदा तिने तिच्या आईला विचारले, ‘‘प.पू. गुरुदेवांची प्रत्यक्ष सेवा करता येण्यासाठी मी काय प्रयत्न करू ?’’
२. मैथिली प्रत्येक कृती करतांना ठेवत असलेला भाव
अ. रामनाथी आश्रमाच्या वाटिकेतील झाडांना पाणी देतांना ‘ही झाडे प.पू. गुरुदेवांची आहेत.’
आ. धान्य निवडतांना ‘मी गुरुदेवांसाठी धान्य निवडत आहे.’
इ. स्वतःचे ताट धुतांना ‘मी गुरुदेवांचे ताट धूत आहे.’
ई. घर झाडतांना ‘मी गुरुदेवांची खोली झाडत आहे.’
१ ई. जाणवलेला पालट
१ ई १. हट्टीपणा उणावणे : तिचा हट्टीपणा पहिल्यापेक्षा पुष्कळ न्यून झाला आहे. एखादी गोष्ट तिला हवी असेल आणि ती न घेण्याविषयी तिला समजावून सांगितल्यावर ती पूर्वीप्रमाणे हट्ट करत नाही.
१ ई २. स्वीकारण्याची वृत्ती वाढणे : तिच्या मनाविरुद्ध काही घडले किंवा जयती लहान आहे; म्हणून आम्ही जयतीसाठी एखादी गोष्ट केली, तर तिला तेवढ्यापुरते वाईट वाटते; पण दुसर्या क्षणाला ती काहीही न झाल्याप्रमाणे सहज वागते.
१ उ. स्वभावदोष : खेळण्यात अधिक वेळ वाया घालवणे, चिडचिड करणे, अभ्यास करण्याचा कंटाळा करणे.’
२. श्री. उदय खानविलकर (मैथिलीचे आजोबा (आईचे वडील, वय ७० वर्षे)), फोंडा, गोवा.
२ अ. आध्यात्मिक स्तरावर खेळ खेळणे : ‘आमच्या घरी आल्यावर मैथिली आणि जयती देवघराच्या समोर ध्यानमंदिराप्रमाणे आसंद्या मांडून खेळतात. तेव्हा आम्ही बोलत असू, तर त्या आम्हाला सांगतात, ‘‘हळू बोला, साधक नामजप करत आहेत.’’ त्या दोघी आरत्या म्हणतात आणि उदबत्ती घेऊन संपूर्ण घराची शुद्धी करतात.
२ आ. अनुभूती : मैथिली आणि जयती आमच्या घरी असतांना कधी कधी उदबत्ती न लावताही सुगंध पसरलेला जाणवतो.’
(वरील सर्व सूत्रांचा दिनांक २८.१०.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |