सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ज्ञानशक्ती प्रसाराची सेवा ‘ऑनलाईन सत्संग सेवे’च्या माध्यमातून करतांना आनंद अनुभवणे
१. ‘ऑनलाईन सत्संग शृंखले’च्या माध्यमातून सेवा करण्याची संधी मिळणे
‘आमच्या येथे ऑक्टोबर २०२० पासून ‘ऑनलाईन सत्संग शृंखला’ चालू झाली. त्या वेळी मला सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे संहिता लेखन आणि सत्संग सेवक म्हणून सेवा करण्याची संधी मिळाली. माझी ही सेवा चालू झाली आणि मला काही दिवसांनी एक स्वप्न पडले.
२. स्वप्नात सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ज्ञानेश्वरी देणे आणि त्यानंतर गुरुकृपा अन् सद़्गुरूंचा संकल्प यांमुळे सेवेतील आनंद घेता येणे
‘स्वप्नात मला सद़्गुरु स्वाती खाडये यांनी ज्ञानेश्वरी दिली. ती मी कृतज्ञताभावाने हातात घेतली आणि आमच्या देव्हार्यात नेऊन ठेवली.’ त्या वेळी या शुभ स्वप्नाचा प्रत्यय मला सेवा करतांना अनुभवता येत होता. तेव्हा गुरुकृपा आणि सद़्गुरूंचा संकल्प यांमुळे मला पुष्कळ शिकायला मिळाले अन् मला सेवेतील आनंद घेता आला. मला ज्ञानेश्वरीप्रमाणे गुरुदेवांच्या ज्ञानशक्तीचा प्रसार सत्संग सेवेच्या माध्यमातून समाजात करता येत आहे. या प्रसारसेवेतून मला शिकण्याची आणि घडण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे मी गुरुचरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
प्रार्थना
‘हे श्रीगुरुदेवा, तुम्हाला अपेक्षित अशी सेवा माझ्याकडून होऊ दे. माझा या सेवेप्रती असलेला कृतज्ञता आणि शरणागत भाव वाढू दे. तुम्ही मला ही सेवा करण्यासाठी शक्ती, बुद्धी आणि चैतन्य प्रदान करा’, अशी मी आपल्या चरणी आर्ततेने प्रार्थना करत आहे.’
– सौ. ज्योत्स्ना रविकांत नारकर (वय ६१ वर्षे), पडेल, देवगड, सिंधुदुर्ग. (२१.८.२०२३)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |