भाऊरायाची ओवाळणी !
कार्तिक शुक्ल द्वितीयेला येते ती ‘भाऊबीज.’ हा दिवस म्हणजे भावा-बहिणीच्या नात्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा आणि निर्व्याज प्रेमाचा दिवस ! ‘आपला भाऊ कर्तृत्ववान व्हावा’, अशी कामना करून बहीण भावाला ओवाळते. ‘आपली बहीण सुखात रहावी’ या इच्छेने भाऊही तिला एखादी वस्तू ओवाळणी म्हणून देतो आणि तिचा सन्मान करतो.
सध्याच्या काळात भावाकडून बहिणीला आदर्श अशी भाऊबीजेची काय बरे ओवाळणी असू शकेल ? सांप्रत काळी या भारतभूवर सर्वत्रच तरुण मुलींच्या, महिलांच्या भोवती ‘लव्ह जिहाद’चा विळखा पडलेला आहे. हे संकट भारतातील प्रत्येकच कुटुंबाच्या दाराशी आहे ! प्रतिदिन देशभरातील अनेक युवती लव्ह जिहादमध्ये फसून पुढे अनेक तर्हेचे क्लेश सहन करतांना दिसतात. काही प्रकरणे उघड होतात, तर काही होतही नाहीत. अनेक हिंदु युवतींची आयुष्ये लव्ह जिहादमुळे उद़्ध्वस्त होतात, तर अनेक तरुणी त्यांचा जीवही हाकनाक गमावतात. यात राष्ट्र-धर्माची प्रचंड मोठी हानी होत आहे. ‘लव्ह जिहादच्या या भयंकर संभाव्य मगरमिठीतून माता-भगिनींची सुटका करणे आणि त्यापासून रक्षण करण्याचे व्रतच अंगीकारायला हवे ’, हीच खरी हिंदु भगिनींसाठी भाऊबीजेची ओवाळणी ठरू शकते, हे हिंदु भावांनी लक्षात घेतले पाहिजे !
माता-भगिनी, तसेच धर्मबांधव यांचे लव्ह जिहादसंदर्भात अजूनही प्रचंड मोठ्या प्रमाणात प्रबोधनात्मक चळवळ उभारणे आवश्यक आहे की, घरोघरी त्याविषयी जागृती होऊन देशातील एकही हिंदु भगिनी त्यात फसणार नाही ! लव्ह जिहादच्या संकटाला तोंड देण्यासाठी युवतींची वैचारिक बैठक सिद्ध होणे अत्यावश्यक आहे. ‘हिंदु धर्म, धर्माची शिकवण, संस्कृती-परंपरा यांविषयी भगिनींच्या मनात दृढ विश्वास निर्माण करणे’, ही काळाची आवश्यकता आहे. राष्ट्र-धर्म यांप्रती स्वतःचे कर्तव्य आणि राष्ट्र-धर्मनिष्ठा यांचे महत्त्व त्यांच्या मनावर अंकित व्हायला हवे. त्यासाठी लव्ह जिहाद म्हणजे नेमके काय ? त्यासाठी धर्मांध तरुणांकडून वापरण्यात येणार्या क्लृप्त्या, होणारी फसवणूक, त्यामुळे होणारी वैयक्तिक, कौटुंबिक, सामाजिक, धार्मिक, तसेच राष्ट्र यांची अपरिमित हानी, पिढ्यान्पिढ्या भोगावे लागणारे दुष्परिणाम, छत्रपतींनी दिलेला लढा, इतिहासातील वीरांगना, तसेच शीलरक्षणाचे महत्त्व इत्यादी भगिनींना समजावून सांगणे क्रमप्राप्त आहे ! अशा प्रकारे ‘लव्ह जिहादमुक्त जीवन’ जगण्याचे ध्येय आपण आपल्या भगिनींना देऊ केल्यास ती अत्यंत सर्वदृष्ट्या अलौकिक आणि मौल्यवान अशी ओवाळणी ठरेल, यात शंका नाही !
– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.