मराठा आंदोलनविरोधी वक्तव्य करणारे विजय वडेट्टीवार यांना धमकी !
विजय वडेट्टीवार यांची सुरक्षा वाढवण्याची मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे मागणी !
नागपूर – मराठा समाजाला इतर मागासवर्गीय (ओबीसी) अंतर्गत दिलेल्या आरक्षणाला विधानसभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांचा विरोध आहे. ‘महाराष्ट्र सरकारने मनोज जरांगे यांच्या २४ डिसेंबरच्या मराठा आरक्षणाच्या मुदतीला घाबरू नये आणि ओबीसींवर अन्याय होईल, असे कोणतेही चुकीचे पाऊल उचलू नये’, असे म्हटले होते. त्यानंतर त्यांना एका संदेशाद्वारे धमकी मिळाली आहे. ही धमकी मिळाल्यावर विजय वडेट्टीवार यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र पाठवून सुरक्षा वाढवण्याची मागणी केली आहे. सरकारने त्यांच्या सुरक्षेत वाढ केली आहे. ‘मराठा समाजातील तरुणांनी आरक्षणाचा निर्णय घेतल्यास भविष्यात त्यांची मोठी हानी होईल’, अशी चेतावणी वडेट्टीवार यांनी दिली होती.