महापालिकेची कचरा आगाराची २ एकर गायरान भूमी धर्मांधांनी विकली !
छत्रपती संभाजीनगर येथील भूखंड माफियांनी केले धाडस !
छत्रपती संभाजीनगर – बनावट कागदपत्रांच्या आधारे भूमी हडप करणार्या टोळक्यांनी नारेगाव येथील महापालिकेच्या कचरा आगाराची (‘डेपो’ची) ४ एकर २० गुंठे जागा हडप करून त्यातील २ एकर भूमी विक्री केली आहे. भूमी हडप करणार्या टोळीत एका वादग्रस्त यूट्यूबर पत्रकाराचाही समावेश आहे. या प्रकरणी गायरान भूमीवर भूखंड पाडून सर्रास विक्री करणार्या ३ धर्मांध भूखंड माफियांच्या विरोधात एम्.आय.डी.सी. सिडको पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
१. या प्रकरणी तलाठी राजेंद्र भांड यांच्या तक्रारीवरून धर्मांध सिल्लेखाना येथील समीर अहेमद सिकंदर कुरेशी, नूतन कॉलनी येथील महंमद बहाओद्दीन झहिरोद्दीन आणि रोशनगेट, नागसेन कॉलनी येथील सय्यद नेहाल सय्यद शकील अहेमद यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
२. चिकलठाणा परिसरात नारेगाव भागातील मांडकी शिवार येथे गट क्रमांक २३१ आणि २३३ ही शासकीय गायरान भूमी आहे. भूखंड माफियांनी या भूमीचे सपाटीकरण करून त्या ठिकाणी पत्र्याचे शेड बांधले आणि प्लॉट पाडून विक्री करण्याचा सपाटा चालू केला. (असे धाडस धर्मांध कुणाच्या जोरावर करतात ? असे करत असतांना प्रशासनाला कळत कसे नाही ? कि प्रशासनातील कुणी सहभागी आहेत का ? हे शोधले पाहिजे ! – संपादक)
३. बनावट कागदपत्रांच्या आधारे शासकीय गायरान भूमी हडप केल्याचे समजताच तहसीलदार आर्.एस्. मुनलोड, मंडळ अधिकारी कृष्णा म्हसरूफ पथकासह घटनास्थळी आले.
४. तेव्हा भूमीवर बल्ला रोवून, तसेच पत्र्याचे शेड मारून काही टोळके अतिक्रमण करत असल्याचे दिसले. यावरून तहसील प्रशासनाने त्यांना तंबी देत अतिक्रमण काढण्याचे आदेश दिले.
५. चिकलठाणा शिवारातील गट क्रमांक २३१ ही गायरान भूमी असून ती तहसील प्रशासनाने महापालिकेला २८ ऑक्टोबर २०२२ या दिवशी प्रदान केलेली आहे. या गटात कचरा डेपो असून या ठिकाणी शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेसाठी नवीन जलकुंभ सिद्ध करण्यात येणार आहे.
संपादकीय भूमिका :गायरान भूमी उघडउघड विकणारे उद्दाम धर्मांध कठोर शिक्षेस पात्र आहेत. अशा धर्मांधांवर लवकरात लवकर कारवाई होणे आवश्यक आहे ! |