International Drugs Racket Busted : मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाकडून अमली पदार्थ व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त
पणजी, १३ नोव्हेंबर (वार्ता.) : मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने अमली पदार्थ व्यवहाराचे आंतरराष्ट्रीय जाळे उद्ध्वस्त केले आहे. या कारवाईमध्ये गोवा, बेंगळुरू, देहली, भाग्यनगर आणि इतर शहरे या ठिकाणी विक्रीसाठी नेण्यात येणारे एकूण १५ कोटी रुपये किमतीचे २ किलो कोकेन हे अमली पदार्थ कह्यात घेतले, तसेच झांबियाचा नागरिक अन् टांझानियाची महिला यांना कह्यात घेण्यात आले आहे.
NCB-Mumbai bursts Int’l drug syndicate
👉🏼 2 kgs Cocaine seized from baggage of Zambian @ Mumbai
👉🏼 Arrived Mumbai by flt on 09.11.23
👉🏼 Tanzanian lady receiver arrested @ Delhi on 11.11.23
👉🏼 Drugs destined to multiple cities
👉🏼 INV ON@dg_ncb @PIBMumbai @ @narcoticsbureau pic.twitter.com/a58asljNe7— NCB MUMBAI (@MumbaiNcb) November 12, 2023
मुंबई अमली पदार्थ पथकाला मिळालेल्या माहितीनुसार झांबियाचा नागरिक गिलमोर मुंबईत अमली पदार्थासह येणार असल्याची माहिती मिळाली. पथकाने गिलमोरला मुंबईस्थित एका हॉटेलमध्ये कह्यात घेऊन त्याच्याकडून अमली पदार्थ कह्यात घेतले.