राज्य परिवहन प्राधिकरणाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक भाडे आकारणी झाल्यास तक्रार करा ! – पी.व्ही. साळी, साहाय्यक प्रादेशिक परिवहन अधिकारी
सांगली- राज्य परिवहन प्राधिकरणाने दीपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खासगी बस वाहतूकदारास या दराच्या ५० टक्के अधिक आकारणी करण्यास अनुमती देण्यात आली आहे. यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडे ९२०९५ ०२०३६ या ‘व्हॉट्सअ राज्य परिवहन महामंडळाचे अनुक्रमे निमआराम, वातानुकूलित आणि वातानुकूलित शयनयान यांचे दरपत्रक पुढीलप्रमाणे आहे. सांगली-मुंबई – ९४६, ९९०, १०६७ रुपये, सांगली ते पुणे – ५४४, ५६६ आणि ६१६ रुपये, सांगली ते सोलापूर – ५००, ५२२ आणि ५६६ रुपये, सांगली ते संभाजीनगर – १ सहस्र १४९ रुपये, १ सहस्र १९९ रुपये आणि १ सहस्र २९२ रुपये.