‘परिवर्तन फाऊंडेशन’च्या वतीने गरजवंतांसमवेत दीपावली !
कोल्हापूर, १३ नोव्हेंबर (वार्ता.) – ‘परिवर्तन फाऊंडेशन’च्या वतीने गरजवंतांसमवेत दीपावली साजरी करण्यात आली. यात गरीब-गरजू लोकांना कपडे, साडी, फराळ वाटप करण्यात आले, तसेच शेंडा पार्क येथील कुष्ठरोगी रुग्णालयातील कुष्ठरोगी बांधवांना फराळ वाटप करण्यात आले. या उपक्रमात अध्यक्ष अमोल कुरणे, डॉ. कौस्तुभ वाईकर, रणजीत कांबळे, मनीषा घुणकीकर यांसह अन्य सहभागी होते.