किरणोत्सवाच्या चौथ्या दिवशी सूर्यकिरणांचा श्री महालक्ष्मीदेवीच्या चरणांना स्पर्श !
श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव !
कोल्हापूर – गेल्या ३ दिवसांपासून ढगाळ वातावरणामुळे श्री महालक्ष्मीदेवीचा किरणोत्सव झाला नव्हता. तो चौथ्या दिवशी म्हणजे १२ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजून ४५ मिनिटांनी झाला. देवीच्या चरणाला स्पर्श करून सूर्याचे किरण देवीच्या उजव्या बाजूस लुप्त झाले. त्यानंतर घंटानाद करण्यात आला आणि देवीची आरती करण्यात आली.
किरणोत्सव कालावधीत भाविकांनी मंदिर परिसरात मोठी गर्दी केली होती.