आजपासून ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’च्या शताब्दी वर्षाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम !
पुणे – ‘देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थे’च्या शताब्दी वर्षास १४ नोव्हेंबरला प्रारंभ होत आहे. त्या निमित्ताने बुधवार पेठ येथील एकनाथ मंगल कार्यालयात सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत चारही वेदांचा मंत्रजागर करण्यात येणार आहे, अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र कुलकर्णी आणि विश्वस्त सुनील पारखी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
१. शताब्दी वर्षात गुणीजनांचा सत्कार, स्मरणिका प्रकाशन, आरोग्य आणि रक्तदान शिबिर आदी उपक्रम घेण्यात येतील. महिलांसाठी विशेष शिबिर आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल.
२. देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्थेची स्थापना २९ ऑक्टोबर १९२४ या दिवशी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर झाली. त्या वेळी सरदार पुरंदरे, सरदार आबासाहेब मुजुमदार, चित्राव शास्त्री आदींच्या पुढाकाराने पुरंदरे वाड्यात संस्थेचा प्रारंभ झाला. वर्ष १९३४ मध्ये संस्थेने बुधवार पेठेत जागा घेतली. त्या जागेवर संस्थेने एकनाथ मंगल कार्यालय उभारले आले. याच वास्तूत विद्यार्थी वसतीगृह आहे. ग्रामीण भागातून शिक्षणासाठी पुण्यात आलेल्या ब्राह्मण विद्यार्थ्यांना येथे प्रवेश दिला जातो. संस्थेचे ६ सहस्र सभासद आहेत.