सायबर फसवणुकीच्या विरोधात ८८७ तक्रारी प्राप्त !
गुन्ह्यांचे उकल होण्याचे प्रमाण ८ टक्के
मुंबई – दिवाळीनिमित्त सवलती आणि बँक केवायसीच्या नावाखाली सामाजिक माध्यमे, तसेच इ-मेलद्वारे लिंक पाठवून सायबर फसवणुकीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. आरोपींना ‘ओटीपी’ क्रमांक ठाऊक नसतांनाही क्रेडिट कार्डमधून परस्पर व्यवहार होत आहेत. सप्टेंबरपर्यंत सायबर फसवणुकीतून पैशाच्या अपहाराच्या ८८७ तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. या तक्रारींचा उलगडा होण्याचे प्रमाण केवळ ८ टक्केच आहे. यात आतापर्यंत १३८ व्यक्तींना अटक झाली आहे.
संपादकीय भूमिका :सायबर फसवणुकीचे वाढते प्रमाण पहाता त्यावर कायमस्वरूपी आळा घालायला हवा ! |