जागतिक आर्थिक स्थिरतेसाठी पंतप्रधान मोदी हे सर्वोत्कृष्ट नेते !
अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांचे वक्तव्य
ओक्लाहोमा (अमेरिका) – अमेरिकेत, तसेच भारतात वर्ष २०२४ मध्ये होणार्या निवडणुकीची वातावरणनिर्मिती होण्यास आरंभ झाला आहे. निवडणुकांचा काळ म्हणजे पालट करण्याची संधी असते. कालातीत धोरणे आणि देशाला मागे घेऊन जाणार्या नेत्यांना नाकारून अशी मूल्ये अन् आवाज पुढे आणले जातात, ज्यांमुळे देशाचे एकत्रित भविष्य खर्या अर्थाने उज्ज्वल होऊ शकेल. अनेक जण मला विचारतात की, मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन का करते ? तर त्याचे उत्तर अगदी सरळ आहे. मी भारत आणि जागतिक स्तरावर पसरलेले भारतीय लोक यांच्यावर प्रेम करते. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतासाठी आणि भारतीय नागरिकांच्या प्रगतीसाठी सर्वोत्कृष्ट नेते आहेत. अमेरिका आणि भारत यांच्यातील संबंधांसाठी, तसेच जागतिक आर्थिक स्थिरतेसाठीही ते सर्वांत चांगले नेते आहेत, असे मी मानते. मुख्यत्वे मोदी हे महिला सशक्तीकरणासाठी कार्यरत आहेत, असे वक्तव्य अमेरिकेच्या प्रसिद्ध गायिका मेरी मिलबेन यांनी केले. त्यांनी यासंदर्भात ‘एक्स’वरून व्हिडिओ संदेश प्रसारित केला आहे.
या वेळी मिलबेन यांनी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी महिलांच्या विरोधात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यांचा निषेध केला, तसेच राज्यातील जनतेने एखाद्या सक्षम महिलेला मुख्यमंत्री करावे, असे आवाहन केले.
अमेरिकी गायिका मैरी मिलबेन ने रोशनी के पर्व दिवाली के अवसर पर ओम जय जगदीश हरे आरती गाया है. उन्होंने एक्स पर पोस्ट कर इसकी जानकारी दी है. इसके साथ ही सभी को दीपावली की बधाई दी है. #MaryMilben #Diwali2023 #Diwali #Deepavali2023 pic.twitter.com/uKRqqg3DuV
— Zee News (@ZeeNews) November 11, 2023
‘ॐ जय जगदीश हरे’ हे भजन म्हणत मेरी मिलबेन यांनी दिल्या दिवाळीच्या शुभेच्छाअन्य एका पोस्टमध्ये मेरी मिलबेन यांनी जगभरातील भारतियांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी त्यांनी ‘ॐ जय जगदीश हरे’ हे भजन म्हटल्याचा स्वत:चा व्हिडिओही ‘एक्स’वरून प्रसारित केला आहे. त्या लिहितात, ‘‘वर्षभरातील माझा सर्वांत प्रिय काळ आला आहे – दिवाळी ! भारतियांसमवेत मी हा सण साजरा करण्यासाठी उत्सुक आहे. जगभरातील भारतीय समुदायाला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा ! तुमच्या आतील प्रकाश घ्या आणि जगभरात जाऊन तो प्रज्वलित करा !’’ |
संपादकीय भूमिकामेरी मिलबेन यांनी पंतप्रधान मोदींचे कौतुक केल्याने आता त्या भाजपच्या ‘एजंट’ असल्याचे कुणी म्हटल्यास आश्चर्य वाटू नये ! |