डेरवण (चिपळूण) येथील वालावलकर रुग्णालयात होणार इंटरव्हेंशन रेडिओलॉजी उपचार
सावर्डे – वालावलकर रुग्णालयात डॉ. अमित साहू इंटरव्हेंशन रेडिओलॉजिस्ट २३ नोव्हेंबर या दिवशी उपलब्ध असणार आहेत. डॉ. अमित साहू मुंबई येथील मोठ्या ‘हॉस्पिटल’मधून इंटरव्हेंशन रेडिओलॉजिस्ट म्हणून काम करतात. (इंटरव्हेंशन रेडिओलॉजी – शरिरात छोट्याशा सुईद्वारे प्रवेश करून रुग्णाला आजार असलेल्या भागांत जाऊन आवश्यक ते उपचार करता येणे.)
डॉ. साहू हे मानेच्या शिरेतील अडथळ्यांची तपासणी, सर्कल ऑफ व्हिलीस अँजिओग्राफी, व्हेरिकोज व्हेन, यकृताचा पित्त घेऊन जाणार्या नलिकांचा कोलॅनजीओ कॅन्सर आदी सर्व प्रकारच्या इंटरव्हेंशनल रेडिओलॉजिचा उपचार पद्धतीत वालावलकर रुग्णालयात सातत्याने करतात. गरजूंनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन वालावलकर रुग्णालयाच्या वतीने करण्यात आले आहे.