Hang The Rapists : आगरा येथील उपाहारगृहात महिला कर्मचार्यावर सामूहिक बलात्कार
आरोपींना अटक
आगरा (उत्तरप्रदेश) : येथील ‘होम स्टे’ उपाहारगृहामध्ये एका २५ वर्षीय महिला कर्मचार्यावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यात ही महिला तिला सोडण्यासाठी विनवण्या करतांना दिसत आहे. पोलिसांनी या प्रकरणी सर्व आरोपींना अटक केली आहे.
(सौजन्य : Oneindia Hindi | वनइंडिया हिंदी)
पीडितेने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार तिला आरोपींनी बलपूर्वक खोलीत नेले आणि मारहाण केली. त्यात तिचा मित्रही सहभागी होता. त्यानेच अन्य ४ जणांना आणले होते. त्यांनी या महिलेला दारू पाजली आणि तिचा आक्षेपार्ह स्थितीत व्हिडिओ बनवला. त्या आधारे ते तिला ब्लॅकमेल करत होते. यानंतर त्यांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला.
संपादकीय भूमिकाअशा बलात्कार्यांना भर चौकात फाशी देण्याची शिक्षा करण्याचा कायदा करण्याची आता नितांत आवश्यकता आहे ! |