रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्यांना १५ सहस्र ते १ लाख रुपये मिळणार
पूर्वीच्या रकमेत सरकार करणार वाढ !
नवी देहली – रस्ते अपघातात घायाळ झालेल्यांना तत्परतेने रुग्णालयात नेणार्यांना केंद्रशासनाकडून ‘समरीटन’ (देवदूत) योजनेंतर्गत ५ सहस्र रुपये देण्यात येतात. यात वाढ करून ही रक्कम १५ सहस्र करण्याची सिद्धता सरकार करत आहे. याखेरीज अशा प्रकारचे साहाय्य करणार्यांची संख्या वाढवण्यासाठी प्रत्येक पंचायतीमध्ये ३ जणांचा गट बनवण्यात येणार आहे. हा गट सर्वप्रथम साहाय्यासाठी जाईल. एका वर्षातील १० सर्वोत्तम साहाय्यकांना १ लाख रुपये मिळणार आहेत. मानधनाची रक्कम केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालय राज्यांच्या परिवहन विभागांना देते.
संपादकीय भूमिकाअपघातात घायाळ झालेल्यांना साहाय्य करणार्यांना सरकार पैसे देते, तरीही लोक साहाय्यासाठी पुढे येत नाहीत. यामागील कारणांचाही सरकारने शोध घेऊन ती दूर करणे आवश्यक आहे ! |