दिवाळीनंतर उत्तरखंडमध्ये समान नागरी कायदा संमत होण्याची शक्यता !
डेहराडून (उत्तराखंड) – उत्तराखंडमध्ये समान नागरी कायदा करण्यासाठी दिवाळीनंतर विधानसभेचे विशेष अधिवेशन बोलावण्यात येणार आहे. यात हा कायदा संमत करण्यात येणार आहे. जर हा कायदा संमत झाला, तर उत्तराखंड असा कायदा करणारे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. लोकांच्या सूचना आणि तज्ञांचा सल्ला घेऊन याचे प्रारूप बनवण्यात आले आहे. यासाठी निवृत्त न्यायमूर्ती रंजना प्रकाश देसाई यांच्या नेतृत्वाखाली एका समितीची स्थापना करण्यात आली होती. राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी नुकतीच या कायद्याचे प्रारूप बनवण्यात आल्याची माहिती दिली होती.
सौजन्य एडिटोरियलजी
संपादकीय भूमिकाएकेक राज्यात हा कायदा करण्यापेक्षा संपूर्ण देशात करणे आवश्यक आहे ! |