बेळतंगडी (कर्नाटक) येथे टिपू सुलतानने नष्ट केलेले भूमीत गाडलेले गोपाळकृष्ण मंदिराचे सापडले अवशेष !
लक्ष्मण नावाच्या व्यक्तीला श्रीकृष्णाने स्वप्नदृष्टांताद्वारे दिलेल्या माहितीनंतर उत्खनन !
मंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटक राज्यातील बेळतंगडी येथे लक्ष्मण नावाच्या व्यक्तीच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्णाने दर्शन देत त्याच्या भूमीच्या शेजारील भूमीत मूर्ती असल्याचे सांगितले. यानंतर लक्ष्मण यांच्या भूमीच्या शेजारी असलेल्या सरकारी भूमीवर अतिक्रमण करून शेती करत असलेल्या हामाद बाबा यांच्या भूमीचे उत्खनन केल्यावर भग्न झालेल्या प्राचीन गोपालकृष्णाच्या मंदिराचे अवशेष सापडले. शेकडो वर्षांचा इतिहास असलेले हे मंदिर टिपू सुलतानाच्या आक्रमणामुळे नष्ट झाले होते. या मंदिराचा जीर्णोद्धार करण्याचा निर्धार गावातील ज्येष्ठ नागरिकांनी केला आहे.