रात्री १० पर्यंतची समयमर्यादा संपल्यावरही फटाके वाजवले !

  • मुंबईकरांकडून उच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन !

  • हवेचा दर्जा पुन्हा खालावला !

मुंबई – हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी केवळ रात्री ८ ते १० या वेळेची अनुमती दिली होती; मात्र नागरिकांनी रात्री १० वाजेनंतरही फटाके फोडले. काही ठिकाणी पहाटेपासूनच मोठ्या आवाजाचे आणि धुराचे फटाके फोडले गेले. परिणामी हवेचा दर्जा पुन्हा खालावला. बहुतेक ठिकाणी धुराचे साम्राज्य निर्माण झाले.

दिवाळीनिमित्त अनेक जण एकाचवेळी प्रवासासाठी बाहेर पडल्याने वाहतूककोंडी झाली होती. काही ठिकाणी रस्त्यात फटाके फोडले जात असल्याने वाहनांची गर्दी झाली. वाहन्यांच्या भोंग्यांमुळे ध्वनीप्रदूषणही वाढले.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणार्‍यांना पोलीस कठोर शिक्षा करतील का ?
  • इतक्या मोठ्या प्रमाणात प्रदूषणाचा धोका निर्माण झालेला असतांनाही न्यायालयाचे आदेश न पाळणारे असंवेदनशील नागरिक ! असे नागरिक समाजकर्तव्य कधीतरी पार पाडू शकतील का ?