(म्हणे) ‘मी राजा सिंह याची हत्या करते !’ – मुसलमान महिला
खासदार असदुद्दीन ओवैसी यांच्यासमोर मुसलमान महिलेची धमकी !
भाग्यनगर (तेलंगाणा) – तेलंगणात विधानसभा निवडणुकीचा प्रचाराच्या वेळी येथील गोशामहल विधानसभा मतदारसंघात एम्.आय.एम्.चे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवैसी घरोघर जात होते. एके ठिकाणी एका महिलेने भाजपचे स्थानिक आमदार आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजासिंह यांना ठार मारण्याची धमकी दिली. याचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. असदुद्दीन ओवैसी यांना उद्देशून महिला म्हणाली, ‘‘हा (असदुद्दीन ओवैसी) वाघिणीचा मुलगा आहे. विरोधकांना संपवून टाका. सगळे जग तुमच्या पाठीमागे उभे आहे. राजा सिंह याच्या विरोधात कुणाला तरी उभे करा. मला त्याच्या विरोधात उभे करा. मी त्याची हत्या करते.
सौजन्य नेक्स्ट टू टीव्ही
संपादकीय भूमिका
|