गेल्या ३ मासांत २५ लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त !
अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई !
मुंबई – अन्न आणि औषध प्रशासनाने गणेशोत्सवापासून आतापर्यंत मुंबईतील अन्न पदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी कारवाई करून तब्बल २५ लाख रुपये किंमतीचे भेसळयुक्त खाद्यपदार्थ जप्त केले आहेत. १३ सहस्र ७२५ किलो भेसळयुक्त अन्नपदार्थांचा साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये खवा, मिठाई, नमकीन, फरसाण आणि खाद्यतेल इत्यादींचा समावेश आहे. या कारवाईमध्ये अन्न आणि औषध प्रशासनाने १६५ खाद्यपदार्थांचे नमुने पडताळणीसाठी घेतले आहेत.