‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीता’ या धर्मग्रंथाचा अभ्‍यास करून त्‍यातील सूत्रे आचरणात आणणारे सनातनचे १०१ वे संत पू. अनंत बाळाजी आठवले (वय ८८ वर्षे) !

सच्‍चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांचे मोठे भाऊ पू. भाऊकाका (पू. अनंत बाळाजी आठवले (सनातनचे १०१ वे संत, वय ८८ वर्षे)) यांची साधिकेला जाणवलेली गुणवैशिष्‍ट्ये आणि त्‍यांच्‍याकडून शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.

पू. अनंत आठवले
कु. दीपाली माळी

१. वाचनाची आवड आणि अभ्‍यासूवृत्ती

‘पू. काका कधीच निवांत बसत नाहीत. ते सर्व नियतकालिके वाचून त्‍यांचा अभ्‍यास करतात. त्‍या ‘लेखामध्‍ये लेखकाने जे लिहिले आहे, ते योग्‍य आहे कि अयोग्‍य आहे ?’, हेही पू. काका सांगतात. पू. काकांचा सर्वच विषयांचा अभ्‍यास पुष्‍कळ आहे.

२. ‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीते’चा अभ्‍यास करून त्‍यानुसार आचरण करणे

पू. काकांनी ‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीते’चा सखोल अभ्‍यास केला आहे. ते ‘श्रीमद़्‍भगवद़्‍गीते’त सांगितल्‍याप्रमाणे सर्व सूत्रे आचरणात आणण्‍याचा प्रयत्न करतात.

३. पू. काकांसह भाषांतराच्‍या सेवेसाठी बसले की, पू. काका विषयाचा पूर्ण अभ्‍यास करून त्‍याविषयी चर्चा करतात आणि त्‍यातील माहिती आम्‍हाला सांगतात.

४. पू. काकांचा नामजप सतत चालू असतो. ते चालतांनाही नेहमी जपमाळ घेऊन चालतात आणि नामजप करतात.

५. इतरांचा विचार करणे

आम्‍ही स्‍वच्‍छता करण्‍यासाठी ते बसलेल्‍या ठिकाणी आल्‍यास ते दैनिक वाचत असतांनाही ‘आम्‍हाला स्‍वच्‍छता करण्‍यास अडचण येऊ नये’, यासाठी स्‍वतः दुसर्‍या खोलीत जातात. ते वर्तमानपत्रे वाचून झाल्‍यावर आठवणीने आश्रमात पाठवतात. ‘गुरुवारचा भक्‍तीसत्‍संग आम्‍हाला ऐकायला मिळावा’, यासाठी ते दुपारी स्‍वत: चहा करून घेतात.

– कु. दीपाली रवींद्र माळी (आध्‍यात्मिक पातळी ६० टक्‍के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.१०.२०२३)