परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगाच्या वेळी कु. दीपाली रवींद्र माळी यांना शिकायला मिळालेली सूत्रे
‘एकदा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या सत्संगात सूक्ष्मातील काही प्रयोग करून घेण्यात आले. त्याविषयी शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.
१. भक्त ज्याप्रमाणे देवाच्या दर्शनासाठी तळमळत असतो, तसेच देवही आपल्या भक्ताला भेटायला आतूर झालेला असतो.
२. गुरुदेवांनी पाण्याला स्पर्श केल्यावर त्यामध्ये पालट होणे, त्याचप्रमाणे साधकांच्या जीवनात गुरुदेव आल्यामुळे साधकांमध्येही पालट होणे
सत्संगाच्या वेळी गुरुदेवांनी पाण्यात एक बोट घातले की, पाण्याचा रंग फिकट गुलाबी होतो. दोन बोटे घातले की, रंग गडद होतो. त्यानंतर जस-जसे एक-एक बोट पाण्यात घातले, तसे पाण्याचा रंग पालटतो. हा प्रयोग झाल्यावर गुरुदेवांनी विचारले की, याविषयी कुणाला काही विचारायचे का ? तेव्हा मी त्यांना म्हणाले, ‘‘जसे पाण्याला तुमचा स्पर्श झाल्याने त्याच्यात पालट होतो, त्याप्रमाणे आम्हा साधकांच्या जीवनात तुम्ही आल्याने आमच्यातही पालट होतो आणि हे सर्व तुम्हीच करू शकता.’’ केवळ साधकांच्या आनंदासाठी गुरुदेव काहीही करू शकतात, हे मी अनुभवले.’
– कु. दीपाली रवींद्र माळी (आध्यात्मिक पातळी ६० टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |