उद्या १४ नोव्हेंबरला असलेल्या बलीप्रतिपदेच्या निमित्ताने…
बलीप्रतिपदा
‘कर्ता-करविता भगवंतच आहे’, याची आपले मन आणि बुद्धी यांना जाणीव करून देत सतत शरणागतभावात राहूया !
‘कार्तिक शुक्ल प्रतिपदा हा दिवस ‘बलीप्रतिपदा’ म्हणून ओळखला जातो. अतिदानशूर वृत्तीमुळे दैत्यांना मागेल ते देण्याचा दोष लागलेल्या बळीराजाला भगवान विष्णूने वामनावतार घेऊन पाताळी धाडले, तो हा दिवस ! बळी हा असुर असूनही त्याच्या उदारतेमुळे आणि शेवटी त्याने सर्वस्व अर्पण केल्यामुळे ईश्वराने त्याला योग्य मार्गदर्शन केले अन् त्याच्या जीवनाचा कायापालट करून त्याचा उद्धार केला.
बळीराजाच्या उदाहरणातून शिकून आपण सर्वांनी ईश्वराप्रती शरणागती वाढवूया. मनुष्याकडे सर्वकाही असले, तरी अहंकारामुळे तो सर्वकाही गमावून बसतो. यासाठीचा उत्तम उपाय म्हणजे शरणागती ! शरणागतीमुळेच अहंकार नष्ट होऊन भगवंताची कृपा प्राप्त होते.
‘कर्ता-करविता भगवंतच आहे’, याची आपण आपले मन आणि बुद्धी यांना जाणीव करून देऊया. आपला देह, मन, बुद्धी, चित्त, या सर्वांसहित सदैव भगवंताप्रती शरणागत राहून ईश्वरचरणी सर्वस्व समर्पित करूया !’
– श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ (१२.११.२०२३)