अफगाणी शरणार्थींना देशाबाहेर हाकलण्याच्या निर्णयावर ३१ डिसेंबरपर्यंत पाककडून स्थगिती
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तान सरकारने वैध अफगाण शरणार्थींना परत पाठवण्याच्या निर्णयावर ३१ डिसेंबरपर्यंत स्थगिती दिली आहे. या निर्वासितांचा पाकमध्ये रहाण्याचा कालावधी काही वर्षांपूर्वीच समाप्त झाला आहे, तरी ते पाकमध्ये रहात आहेत.
पाक सरकारने पाकमध्ये रहाणार्या अफगाणी नागरिकांना १ नोव्हेंबरपूर्वी देश सोडून जाण्याचा आदेश दिला होता. त्यानंतर पाक या शरणार्थींना देशाबाहेर काढत आहे. आतापर्यंत २ लाख ५० सहस्र अफगाणी नागरिक स्वतःहून पाक सोडून गेले आहेत, तर ८० सहस्र लोकांना हाकलण्यात आले आहे. पाकमध्ये एकूण १७ लाख अफगाणी शरणार्थी आहेत.