प्रेयसीची निर्घृण हत्या केल्यावरून १७ वर्षांचा कारावास भोगणार्या तरुणाची पुतिन यांनी केली सुटका !
युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे सुटका !
मॉस्को (रशिया) – अमेरिकेत प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याच्या प्रकरणी १७ वर्षांच्या कारावासाची शिक्षा भोगत असलेल्या तरुणाची राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी सुटका केली. या तरुणाने युक्रेनविरोधातील युद्धात सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यामुळे पुतिन यांनी त्याची सुटका केली आहे. या तरुणाने प्रेयसीसमवेत प्रेमभंग झाल्याने त्याने तिची १११ वेळा शस्त्राने वार करून हत्या केली होती. त्यापूर्वी तिच्यावर बलात्कार करून साडेतीन घंटे तिचा छळ केला होता. ही घटना घडत असतांना शेजार्यांनी पोलिसांना ७ वेळ दूरभाष केला; मात्र पोलिसांनी तो उचलला नव्हता. (भारतातच नव्हे, तर रशियातील पोलीसही असे वागतात ! अशा पोलिसांना जनतेने कर भरून कशाला पोसायचे ? – संपादक) व्लादिस्लाव कान्युस असे त्याचे नाव आहे. १७ पैकी केवळ १ वर्षे त्याने शिक्षा भोगली होती. पुतिन यांच्या निर्णयाचा पीडित तरुणीच्या आईने निषेध केला आहे, तसेच तिच्या जिवाला धोका असल्याचेही तिने म्हटले आहे.
सौजन्य क्नोन्यूज