साधकांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांना याच नावाने संबोधावे !
‘१४.५.२०२० या दिवशी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये ‘आजपासून सनातनच्या साधकांनी सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांना ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असे संबोधित करावे’, असे प्रसिद्ध करण्यात आले होते. त्या दोघींना तसे संबोधित करण्यास सप्तर्षींनी ‘सप्तर्षी जीवनाडीपट्टी’च्या माध्यमातून सांगितले आहे. असे असूनही अजूनही बरेच साधक ‘सद्गुरु बिंदाताई’ किंवा ‘पू. ताई’, तसेच ‘सद्गुरु गाडगीळकाकू’ किंवा ‘पू. काकू’, असा उल्लेख करतात. सनातनच्या साधकांनी सप्तर्षींचे आज्ञापालन करून ‘श्रीसत्शक्ति’ आणि ‘श्रीचित्शक्ति’ हे शब्द उच्चारल्यास ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि त्यांच्याशी संबंधित शक्ती एकत्र असतात’, या अध्यात्मातील सिद्धांतानुसार त्या शब्दांतून दैवी शक्ती कार्यरत होऊन ती साधकांना मिळेल. त्यामुळे साधकांनी बोलतांना किंवा लिहितांना ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ’ आणि ‘श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, असाच उल्लेख करावा !’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.११.२०२३)