मुंबईत ५ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

मुंबई – कांदिवली आणि घाटकोपर येथील मुंबई गुन्हे शाखेच्या अमली पदार्थविरोधी पथकाने धारावी अन् दहिसर भागांतून एम्.डी. ड्रग्ज आणि गांजा हे अमली पदार्थ जप्त केले. आंतरराष्ट्रीय बाजारात यांचे अंदाजे मूल्य ५ कोटी रुपये इतके आहे.

या प्रकरणी नायजेरियाच्या नागरिकासह दोघांना अटक करण्यात आली आहे.