Acharya Pramod Krishnam on Congress : काँग्रेसमधील काही नेते श्रीराममंदिर आणि श्रीराम यांचा तिरस्कार करतात !
काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांचा घरचा अहेर !
नवी देहली – आमच्या पक्षात अनेक नेते आहेत, जे केवळ श्रीराममंदिरच नव्हे, तर श्रीरामाचाही तिरस्कार करतात. केवळ हिंदुत्वाचाच नव्हे, तर हिंदु शब्दाचा तिरस्कार करतात. हिंदु धर्मगुरूंचा अपमान करतात, असा घरचा अहेर काँग्रेसचे नेते आचार्य प्रमोद कृष्णम् यांनी दिला आहे.
Cong’s Acharya Pramod Krishnam says, “Being a part of a party doesn’t mean that the truth cannot be called the truth and a lie cannot be called a lie..Is talking about the country, Sanatan Dharma and saying Vande Mataram is joining BJP?
“Being a part of a party doesn’t mean… pic.twitter.com/nXqAX2CC4W
— ANI (@ANI) November 10, 2023
आचार्य कृष्णम् पुढे म्हणाले, जे रामाचा तिरस्कार करतात, ते हिंदु असू शकत नाहीत. श्रीराममंदिराला खूप विरोध झाला आणि हा विरोध आपण सर्वांनी पाहिला आहे. त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्याद्वारे आपल्याला समजले की, कुणाची श्रीरामावर श्रद्धा आहे आणि श्रीरामाचा तिरस्कार कोण करते ? मी पक्षाचा भाग असलो, तरी त्याचा अर्थ असा नाही की, मला सत्याला सत्य म्हणता येणार नाही किंवा असत्याला असत्य म्हणता येणार नाही.
संपादकीय भूमिकाअशा तिरस्कारी नेत्यांना काँग्रेस पक्षातून का काढून टाकत नाही ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्या अशा नेत्यांना पक्षात ठेवून काँग्रेस हिंदूंचा अपमानच करत आहे, हे हिंदूंनी लक्षात घ्यावे ! |