फेरीबोट तिकीट दरवाढ परिपत्रक लवकरच मागे घेणार ! – मुख्यमंत्री डॉ. सावंत
पणजी, १० नोव्हेंबर (वार्ता.) : फेरीबोट तिकीट दरवाढ परिपत्रक लवकरच मागे घेतले जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.
गोवा सरकारच्या नदी परिवहन खात्याने फेरीबोटमध्ये प्रति दुचाकीसाठी १० रुपये तिकीट, तर चारचाकीसाठीचे तिकीट १० रुपयांवरून ४० रुपये केले होते. तसेच दुचाकी आणि चारचाकी चालकांसाठी अनुक्रमे १५० रुपये आणि ६०० रुपये मासिक ‘पास’ उपलब्ध करण्यात आले होते. ही दरवाढ १६ नोव्हेंबरपासून लागू होणार होती; मात्र वाढता विरोध लक्षात घेऊन सरकारने दरवाढ मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे.